सततच्या निर्बंधामुळे नोकरी गेल्याने त्रस्त जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलं

 लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त, पुण्यातील जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलंपुणे : नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाईफगार्ड म्हणून काम करणारा तरुण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पुण्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


पुणे शहरातील केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. दत्ता पुशीलकर असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सततच्या निर्बंधामुळे दत्ताची नोकरी गेल्याची माहिती आहे. याच कारणामुळे तो त्रस्त होता, असंही बोललं जातं.दत्ता पुशीलकर हा पुण्यातील नांदे तलावाचा जीवरक्षक म्हणून काम करत होता. 2020 पासून काम नसल्याने कौटुंबिक कलह वाढल्याचंही बोललं जातं. अखेर कंटाळून काल त्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं समोर आलं आहे. कोणे एके काळी इतरांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या उमद्या तरुणाने स्वतःचंच जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post