तलवारीने कापून टाकण्याची धमकी कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 तलवारीने कापून टाकण्याची धमकी कोतवाली ठाण्यात  चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर -  तुला तलवारीने कापून टाकेल अशी धमकी देते एकाला लोखंडी फायटर ने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.  साहीर साबीर शेख वय 23 वर्ष ता जि अहमदनगर धंदा खाजगी नोकरी रा आलमगीर भिंगार  यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  दिनांक 27/12/2021 रोजी सकाळी 11 / 30 वा चे सुमारे मी जुनी महानगरपालिका बेग पटांगणामध्ये वसुली करिता गेलो होतो. त्यावेळी बागवान गल्ली पंचपीर चावडी ता जि अहमदनगर असे सर्व जण माझे जवळ आले व मला म्हणाले की तू येथे कशाला उभा राहीला.  तु तुझी मोटार सायकल घेवून निघुन जा, त्यावेळी त्यांना समजावून सांगितले की, 'मला फायन्सची वसूली करायची आहे. माझा क्लाईट येणार आहे,  म्हणुन थबलो आहे. असे सांगत असताना याचा आरोपीनी येऊन मनात राग धरुन मला त्यांनी मला वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली.  त्यावेळी बामगिर उर्फ रिजवान महेबुब शेख याने त्याचे दोन्ही हातांनी माझा गळाजोरात दाबुन धरला व मुजाहिद व समीर यांनी त्यांचे हातातील लोखंडी जलाने माझे पाठीवर पोटावर बरगडीवर मारुन जबर मुका मार दिला तसेच रफिक बागवान याने त्याचे हातातील लोखंडी फायटरने छातीवर व पोटावर तसेच दोन्ही कानाजवळ मारुन दुखापत केर्ली व मला म्हणाले की तु आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या कुटुंबांतील लोकांना एकेकाला तलवारीने कापुन टाकु, अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


यासंदर्भात 1) रिजवान महेबुब शेख 2 ) मुजाहिद उर्फ जहीद महेबुब शेख 3 ) रफिक रिक्षात घालुन सिव्हील हॉस्पीटलला अहमदनगर येथे आणुन लोखडी गजाने तसेच लोखंडी फायटरने मारहाण करुन अँडमीट केले 1 ) जहांगिर उर्फ सलीम बागवान 4 ) समीर सय्यद सर्व रा बागवान गल्ली पंचपीर चावडी ता जि अहमदनगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post