भिंगारमध्ये हनुमान चालिसा लावल्याने घरात घुसुन दमदाटी, शिवसेना आक्रमक, समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी

 

भिंगारमध्ये हनुमान चालिसा लावल्याने घरात घुसुन दमदाटी, शिवसेना आक्रमक, समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणीनगर-  हिंदूंच्या हनुमान चालीसेला वारंवार विरोध करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही समाज कंटक करीत आहेत. या प्रकारामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार आणि जाणून बुजून केला जात आहे. हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू दिला जाणार नाही असा इशारा  नगर शहर शिवसेनेच्या वतीने पत्रक काढून देण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी भिंगार येथे मुंडे परिवाराच्या घरी हनुमान चालीसा पाठ सुरु होता. ही बाब न रुचल्याने आणि दोन समाजात जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समाज कंटकांनी केलेला प्रकार खूप निंदनीय आहे. मुंडे परिवार करीत असलेली पूजा अर्चा त्यांच्या डोळ्यात खुपल्याने परिससरातील  सोहेल शेख आणि त्यांच्या तीन ते चार साथीदार मुंडे यांच्या घरात घुसले. त्यांनी मुंडे यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. आणि हनुमान चालीसा ज्या स्पीकरमधून ऐकू येत होती तो त्यांनी फोडून टाकला. ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते,  युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल भैय्या राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. विचारपूस करून मुंडे परिवाराला व परिसरातील रहिवाशांना धीर दिला.
शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोन्द्रे यांना सूचना करून या परिसराला संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात सांगितले. यावेळी इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि भिंगारकर शिवसैनिकांची एकजूट पाहायला मिळाली. संदर्भात अशांतता पसरवून दहशत निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे प्रकार पोलिसांनी न थांबविल्यास व संबंधितांवर त्वरित कारवाई न केल्यास कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यास त्यावेळी शिवसेना जबाबदार राहणार नाही असा इशारा देण्यात आला.
भिंगार येथील घटनेत जाणूनबुजून अशा घटना घडवून शहरात दंगल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना हे कधीच खपवून घेणार नाही. समाजात दुहीची बीजे पेरण्याचा हा प्रकार आहे हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे असे शिवसेनेने पत्रकात नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post