कोंबड्या अंगणात येत असल्याने वाद...महिलेची कुर्‍हाडीने निर्घुण हत्या

कोंबड्या अंगणात येत असल्याने वाद...महिलेची कुर्‍हाडीने निर्घुण हत्या पुणे - कोंबड्या अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात कुऱ्हाडीने वर करत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बारामती  तालुक्यातील कऱ्हावागज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटने प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक  करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गंगूबाई तात्याराम मोरे असे आहे. मृत महिला आणि आरोपाचे घर समोरा-समोर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि ५ फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होते. रविवारी (९ जानेवारी ) दुपारी देखील याच कारणावरून आरोपीच्या बायको बोरबर गंगुबाई यांचा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपी किरणने गंगूबाई यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या. गंगुबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post