बँकेकडून कर्ज देण्यास नकार...‘त्याने’ बँकच दिली पेटवून

 

बँकेकडून कर्ज देण्यास नकार...‘त्याने’ बँकच दिली पेटवूनबँकेकडून कर्ज घेणे सोपे काम नाही. अनेकवेळा बँक कर्ज देण्यासही नकार देते. पण कर्नाटकातील हावेरीमध्ये एका व्यक्तीने कर्ज देण्यास नकार दिल्याने बँक पेटवून दिली आहे. गेल्या रविवारी ही घटना घडली आहे. कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीने रविवारी हावेरी जिल्ह्यात बँकेला आग लावली होती.

एएनआयच्या वृत्तानुसार, कागिनेली पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४३६, ४७७ आणि ४३५ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होती आणि त्यासाठी तो बँकेत गेला होता. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने रविवारी बँकेलाच आग लावली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post