एटीएम फोडण्याचा प्रयत्न, तीनही आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद

 

 एटीएम फोडण्याचा प्रयत्न, तीनही आरोपी 24 तासाच्या आत जेरबंदशहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दि 14 रोजी रात्रीच्या सुमारास माळीवाडा वेशी जवळील मार्केट यार्ड रोडवरील साठे वसाहती लगत असलेल्या साई आनंद लॉज जवळील एटीएम मध्ये घडली.

शहरातील माळीवाडा परिसरातील वेशी जवळील गजबजलेल्या परिसरात मार्केट यार्ड रोडवर साठे वसाहती लगत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी प्रथम एटीएम चा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आतील सीसीटीव्ही कॅमेरा चे नुकसान केले. आतील मशीन फोडण्याचा प्रयत्न केला परंतु या वेळी मोठा झालेल्या आवाजाने चोरी करण्याचा प्रयत्न फसला. चोरट्यानी तेथून पळ काढला. कोतवाली पोलिसांनी सर्वप्रथम सनी सुरज सिंग भोड (वय 25 रा. संजयनगर, काटवण खंडोबा, नगर) यास शिताफीने अटक केली होती. तर आता यातील फरार दोन्ही आरोपी पोलिसांना मिळून आले आहेत.

याप्रकरणी  पो.ना. योगेश कवाष्टे यांच्या फिर्यादीवरून सनी सुरज भोड (वय २५, रा.संजयनगर काटवन खंडोबा,नगर), चिक्या उर्फ रोहित मेहेञे (रा.इंदिरानगर साठेवस्ती,नगर), सोनू सुरज सिंग भोड (रा. संजयनगर, काटवन खंडोबा रोड, नगर) अशा तीनजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुरनं ३७/२०२२ भादंवि कलम ३७९,५११,४२७,३४ प्रमाणे चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर पुढील तपास पोना गणेश धोत्रे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post