उत्तर प्रदेश...भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, मित्र पक्षांनी दबाव वाढवला

 ओबीसी नेत्याचं राजीनामा सत्र सुरुच, मित्र पक्षांनी दबाव वाढवलालखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपमधील ओबीसी समाजाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्ष नेतृत्वाची चिंता वाढलीय. अशातच भाजपचे सहयोगी पक्ष निषाद पार्टी आणि अपना दल  यांनीदेखील दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचं मित्र पक्ष अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या निर्णयाकडे देखील मोठा लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजाच्या मोठे नेत्यांनी भाजप सोडल्यानंतर सहयोगी पक्षांनी भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी 36 जागांची मागणी केलीय. यामध्ये पूर्वांचल मधील काही जागांसह अवध आणि बुदेलंखड आणि कानपूरमधील जागांचा समावेश आहे, 2017 मध्ये अमित शहा यांनी युतीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अपना दलाला 17 जागांची मागणी केली होती मात्र भाजपने त्यावेळी अकरा जागा दिल्या होत्या. 11 जागांपैकी 9 जागा जिंकत अपना दलाच्या नेत्यांनी स्ट्राईक रेट चांगला असल्याचे देखील दाखवून दिलं होतं. यावेळी अपना दलाच्या नेत्यांची जागांची मागणी वाढवलेली आहे. चोवीस जागांवर अपना दलाची ताकद असल्याचा त्यांचा दावा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post