योगी आदित्यनाथ प्रथमच लढवणार विधानसभा निवडणूक.... मतदारसंघाबाबत केली घोषणा

 

योगी आदित्यनाथ प्रथमच लढवणार विधानसभा निवडणूक.... मतदारसंघाबाबत केली घोषणालखनौ:  प्रदेशमध्ये काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ते कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. कोणत्या जागेवरून त्यांना निवडणूक लढवायची आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, “पक्ष सांगेल तिथूनच मी लढेन. कोणत्याही जागेला माझी वैयक्तिक पसंती नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. भाजपाच्या तीनशेहून अधिक जागा येतील,” असा दावा त्यांनी केला. योगी आदित्यनाथ यावेळी विधानसभा निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल.


योगी आदित्यनाथ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी आतापर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यावर्षी निवडणूक लढवल्यास ती त्यांची पहिली विधानसभा निवडणूक ठरेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post