किरकोळ वाद आणि मुख्याध्यापकाने चावला शिक्षकाचा अंगठा, प्रकरण थेट पोलिसांत

 किरकोळ वाद आणि मुख्याध्यापकाने चावला शिक्षकाचा अंगठा, प्रकरण थेट पोलिसांतनाशिक: शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर भांडणात झाले. हे भांडण नंतर ऐवढे टोकाला गेले की यामध्ये शाळेचा मुख्याध्यापक थेट शिक्षकाच्या अंगठ्याला चावला. येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला आहे. तर ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील हे भांडण थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. मुख्याध्यापकाच्या या हल्ल्यात शिक्षक राजगुरु यांच्या अंगठ्यातून रक्त आल्याने तेथे जखम झाली आहेत. शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकराणाचा पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post