....तर राज्यातील दारू दुकाने, वाईन शॉप बंद करणार

 ....तर राज्यातील दारू दुकाने, वाईन शॉप बंद करणार जालना : दारूची दुकाने किंवा वाईन शॉप वर गर्दी होत असेल तर, गर्दी टाळण्यासाठी त्या ठिकाणी निर्बंध लावण्यात काहीच अडचणी नाहीत असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच  लागू होणाऱ्या निर्बंधांना नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील  राजेश टोपे यांनी केली आहे.

प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. टोपे म्हणाले, मंदिर किंवा धार्मिक स्थळी एकावेळी जास्त गर्दी करू नये.  नव्या नियमावलीनुसार  मंदिर बंद केले  नाहीत. पण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40 ते 50 च्यावर  संख्या असू नये.सरकार मनमानी करत आहे. निर्बंधाबाबत विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत या विरोधकांच्या आरोपावर बोलताना टोपे म्हणाले, आपण सगळ्यांनाच विश्वासात घेतो.  पण दररोज आकडे 40 हजारांच्यावर जात असतील तर संख्येच्या माध्यमातून काळजीचे कारण आहे. म्हणून संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध महत्त्वाचे आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post