राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


प्रा.माणिकराव विधाते यांचे सामाजिक काम कौतुकास्पद - आ.संग्राम जगताप नगर  -प्रा.माणिकराव विधाते हे फक्त पक्षा पुर ते काम करत नसून तर समाजातील विविध सामाजिक प्रश्न हाती घेऊन सोडविण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय-धोरणे समाजामध्ये रुजविण्याचे काम प्रा.विधाते हे करत आहेत. युवकांना संघटित करून सामाजिक,राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
         राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांच्या वाढदिवसा निमित्ताने सत्कार करतांना आ.संग्राम जगताप,नगरसेवक प्रकाश भागानगरे,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार,राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी,विद्यार्थी संघटनेचे वैभव ढाकणे,अमित खामकर,संतोष ढाकणे,मळू गडळकर,गणेश बोरुडे,भरत गरूडकर,गजेंद्र भांडवलकर,लहू कराळे,निलेश इंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post