वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू

 

वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी,  ६ जणांचा मृत्यूजम्मू काश्मीर : जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल सहा जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे.


मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त यांच्या माहितीनुसार, माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post