श्रेय कोणाचं? शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी....

 श्रेय कोणाचं? शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी....ठाणे :  ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्री जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे  कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या  नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. 

राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच हा वाद फक्त बॅनरबाजीवर थांबला नाही तर थेट हमरातुमरीवर पोहोचला. यावेळी पाठपुरावा आम्ही केला आणि बॅनरबाजी तुमची हा दोन्हीकडील कार्यकर्त्यांचा समज होत. कार्यकर्ते तर एकमेकांना भिडलेच, मात्र नगरसेवकही मागे राहिले, यावेळी नगरसेवाकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post