राज्यपाल मलिक यांचे स्फोटक वक्तव्य... मोदींना टोले लगावत शिवसेनेकडून अमित शहा यांची पाठराखण


राज्यपाल मलिक यांचे स्फोटक वक्तव्य... मोदींना टोले लगावत शिवसेनेकडून अमित शहा यांची पाठराखणमुंबई:  मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं या वादग्रस्त राज्यपालांच्या टीकेवर पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. मात्र त्याचवेळी मलिक यांनी अमित शाह यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दाव्यावरुन मात्र शिवसेनेनं अमित शाह यांची बाजू घेतल्याचं चित्र दिसत आहे.मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड यांच्याप्रमाणे राजभवनात बसून ते राजकारण करतात की नाही याबाबत शंका आहे, पण राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिका आणि विधाने वाद ओढवून घेणारी ठरली आहेत. जम्मू-कश्मीर, गोवा, मेघालय अशा राज्यांत ते होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाद ओढवून घेतले. सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत. राज्यपाल मलिक यांनी आता असे म्हटले आहे की, “मोदी हे प्रचंड अहंकारी गृहस्थ आहेत.’’ सत्यपाल मलिक यांनी यात नवीन असे काय सांगितले? पण मलिक पुढे सांगतात ते महत्त्वाचे. शेतकरी आंदोलन संपवा, आतापर्यंत ५०० शेतकरी मरण पावले आहेत, असे सांगण्यासाठी आपण मोदींना भेटलो तेव्हा त्यांचा प्रतिसाद बरा नव्हता. ‘‘माझ्यासाठी ते ५०० शेतकरी मेलेत काय?’’ असा उलटा प्रश्न मोदी यांनी केला तेव्हा आपले व त्यांचे भांडण झाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. खरेखोटे मोदीच जाणोत. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कार्यपद्धती कशी आहे ते काही लपून राहिलेले नाही. मोदींचे भक्त अनेक आहेत, पण मोदी स्वतःचेच भक्त आहेत. स्वभक्ती आली की अहंकार हा आलाच,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

मोदी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळू दिले. त्यात पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले तरी ते काळे कायदे माघारी घ्यायला तयार नव्हते. हा अहंकारच होता. मलिक यांनी तेच सांगितले,” असंही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. 

“हे मलिक गृहमंत्री अमित शाहांना भेटले. तेथेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा केली. शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबतीत वेगळ्या भाषेचा वापर केल्याचे मलिक म्हणतात. ते मात्र न पटणारे आहे. अमित शाह मोदींविषयी चुकीचे शब्द व चुकीच्या भावना व्यक्त करतील यावर त्यांच्या दुष्मनांचाही विश्वास बसणे कठीण आहे. मलिक बोलतात ते सगळे सत्यवचन आहे असे मानता येणार नाही. मलिक हे समाजवादी मुशीतून तयार झाल्याने त्यांचे वागणे-बोलणे चौकटीबाहेरचे असते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post