शिक्षकाची ग्रामपंचायतीमध्ये विस्तार अधिकार्याला मारहाण, नगर जिल्ह्यातील घटना


शिक्षकाची ग्रामपंचायतीमध्ये विस्तार अधिकार्याला मारहाण, नगर जिल्ह्यातील घटनानगर:  आईचे नाव घरकुल यादीतून का वगळले असे म्हणून शिक्षकाने विस्तार अधिकार्‍यास मारहाण केल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ धोंडीराम सरोदे, विस्तार अधिकारी हे शासनाचे घरकुल योजनेचे काम करत असताना लालू महादू वायाळ या शिक्षकाने त्यांना मारहाण केली आहे.

याबाबत विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे (रा. गुंजाळवाडी ता. संगमनेर) यांनी अकोले पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे कि फिर्यादी काशिनाथ सरोदे (विस्तार अधिकारी) हे कार्यालयीन सहकारी यांचेसह केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 10/01/2022 रोजी दुपारी 1.30 वाजेचे सुमारास शासकीय कर्तव्य पार पाडत असताना आरोपी लालू महादू वायाळ (शिक्षक) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन माझे आईचे नाव घरकुल यादीतून का वगळले असे म्हणून वाईट-साईट शिवीगाळ करू लागला.

यावेळी त्याला समजावून सांगत असता त्याने विस्तार अधिकारी असलेले फिर्यादी यांना हाता बुक्क्यांनी तोंडावर मारहाण केली असल्याने तसेच दुसरे आरोपी दत्तात्रय गोविंद वायाळ, सुनील कोंडीबा वायाळ (दोन्ही रा. केळी ओतुर ता. अकोले, जि. अहमदनगर) यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन अंगावर धावून येऊन वाईट साईट शिवीगाळ व दमबाजी करून मी व सहकारी करीत असलेल्या शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post