नगरपालिका कर्मचारी पगारापासून वंचित, कार्यकर्त्याचा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न, अधिकार्यांची भंबेरी उडाली


नगरपालिका कर्मचारी पगारापासून वंचित, कार्यकर्त्याचा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न नगर: शेवगाव नगरपरिषदेतील कामगार कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांच्या थकीत पगाराबाबत वारंवार आंदोलन, मोर्चे, काम बंद आंदोलन पुकारूनही कामगारांच्या थकीत पगाराबाबतीत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने कामगारावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. गुरूवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य काउन्सीलचे सदस्य युवा कार्यकर्ते कॉ.संजय नांगरे यांनी अचानक नगर परिषदेच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याचा निर्धार केला.यामुळे नगर परिषदेतील वेगवेगळ्या विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. 

नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी आस्थापना विभाग अधिकारी बबन राठोड यांनी केलेल्या चर्चेनंतर कामगारांचे थकीत दोन पगार दि.25 जानेवारी पर्यंत देण्याचे मान्य केल्यानंतर कॉ.नांगरे यांनी पुकारलेले अभिनव आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मुख्याधिकार्‍यांनी आपला शब्द पाळला नाही तर कामगार पगाराबाबतचे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कॉ.नांगरे व त्यांच्या मित्रमंडळाने जाहीर केला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post