गृहकर्ज खाते हस्तांतरणासाठी लाच, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यासह दोन आरोपी 'सीबीआय'च्या जाळ्यात

 लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यासह दोन आरोपींना अटक केलीमुंबई: सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने महाराष्ट्र राज्यातील अमरावती मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय कॅप सिक्युरिटीज मधील गृह कर्ज विभागातील सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्या साथीदाराला लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, अमरावती येथून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे गृहकर्ज खाते हस्तांतरित केल्यावर टॉप-अप कर्जाची प्रक्रिया आणि मंजुरीसाठी  20,000/- रुपयांची कथित लाच मागितल्याच्या आरोपावरून अमरावती मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय कॅप सिक्युरिटीज मधील गृह कर्ज विभागातील सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्याचा एक साथीदार/खाजगी व्यक्ती (कथितपणे आयसीआयसीआय बँक, गाडगे नगर शाखा, अमरावती येथे खाजगी व्यक्तीच्या भूमिकेत काम करणाऱ्या) यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक अमरावतीकडून 12 लाख रुपयांचे (अंदाजे) गृह कर्ज घेतले आणि कर्ज खाते ICICI बँक गाडगे शाखेत हस्तांतरित करण्यासाठी संबंधित साथीदाराशी संपर्क साधला, असा आरोप पुढे करण्यात आला. त्यांनी तक्रारदाराला कर्ज खाते आयसीआयसीआय बँकेऐवजी एसबीआय कॅम्प शाखेत हस्तांतरित करण्याची सूचना केली. त्यानुसार, तक्रारदाराने कर्ज हस्तांतरणासाठी तसेच SBI कडून टॉप अप कर्ज मंजूर करण्यासाठी अर्ज केला. आरोपींनी गृहकर्ज खाते हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली आणि टॉप अप कर्ज जारी केले असाही आरोप आहे. आरोपीने तक्रारदारांच्या घरी जाऊन तक्रारदाराकडून. 20,000/- रुपयांची बेकायदेशीररीत्या मागणी केली.

सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून अंशतः पेमेंट म्हणून 10,000/-रु.ची लाच मागताना आणि स्वीकारताना पकडले. 

आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली.


अटक केलेल्या दोन्ही आरोपींना आज विशेष न्यायाधीश, सीबीआय प्रकरणे, अमरावती (महाराष्ट्र) यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post