रेल्वे सुरक्षा दलात मोठी भरती! त्या जाहीरातीबाबत रेल्वेचा मोठा खुलासा...

 

युवकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नयेनागपूर :  शासकीय नोकरीचे घटते प्रमाण आणि वाढत्या बरोजगारीचा गैरफायदा घेत काही संकेतस्थळावरून रेल्वे सुरक्षा दलात ९०० पदांकरिता भरती होत असल्याची बनावट जाहिरात देण्यात आली आहे.  रेल्वेने त्याविषयीचा खुलासा देत अशा प्रकारची कोणतीही भरती रेल्वेतर्फे होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.  डीमेर हरयाणा या संकेतस्थळावर आरपीएफ कॉन्स्टेबल भरती २०२२ या नावाने जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार, ९०० पदांसाठी भरती होत असून त्यासाठी ९० मिनिटांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा रेल्वे मंत्रालयात होणार असून राष्ट्रीय पातळीवरील असेल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी घेतली  जाईल, असे म्हटले आहे. इंग्रजी आणि हिंदूी भाषेसह मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांतून ही परीक्षा देता येईल. त्यासाठी खुल्या, ओबीसी आणि ईडब्ल्यू गटातील उमेदवारांना ५०० रुपये आणि एससी, एसटी आणि महिलांसाठी अडीचशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

१८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींना या परीक्षेसाठी अर्ज करता येईल. ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी अशी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया होणार असल्याचे या बनावट जाहिरातीत म्हटले आहे. ही जाहिरात आल्यानंतर अनेक युवक-युवतींना त्यासाठी अर्ज केले. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ही जाहिरात बनावट असल्याचे उघडकीस आले. रेल्वेने आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात प्रकाशित केलेली नाही. रेल्वेची आरपीएफ भरतीची सध्या कोणतीही योजना नाही. युवकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये. संकेतस्थळावर अर्ज करु नये, असे आवाहन मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post