चंद्रकांत पाटील म्हणतात... रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हणण्यात गैर काहीच नाही...फुलनदेवी नाही म्हटलं कोणी

 

चंद्रकांत पाटील म्हणतात... रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हणण्यात गैर काहीच नाही...फुलनदेवी नाही म्हटलं कोणीमुंबई:  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोललं तरी चालतं, पंतप्रधानांवर टीका केली तरी चालते. पण भाजपामधील कोणी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते. भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलं होतं, फूलन देवी नाही, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी शिवी नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.

“जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हटलं यात काहीच गैर नाही. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी राज्य सांभाळलं होतं. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, याप्रकरणी आम्ही त्यांना समज दिलीय. भाजपाची महिलांबद्दल योग्य शब्दांत बोलण्याची संस्कृती आहे,” असं पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post