पक्षात अवहेलना... भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

 

पक्षात अवहेलना... भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवरपरभणी : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे  हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गव्हाणे यांच पक्ष सोडून जाणे भाजपला परभणीमध्ये कमकुवत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान माजी आमदार विजय गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढेआणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. गव्हाणे हे मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात होते, मात्र भारतीय जनता पक्षात आपली अवहेलना होत असल्याने पक्षत्याग करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post