माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुस-यांदा करोना संसर्ग

 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुस-यांदा करोना संसर्ग मुंबई: माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post