दिलासादायक.... फुफ्फुसावर 'ओमायक्रॉन'चा खूप परिणाम नाही... संशोधनातून समोर आली माहिती

 दिलासादायक.... फुफ्फुसावर ओमायक्रॉनचा परिणाम नाही... संशोधनातून समोर आली माहितीपुणे : करोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन हा विषाणू केवळ घशावर परिणाम करत असल्याने फुप्फुसांच्या आरोग्याला त्याचा धोका कमी असल्याचे दिसून येत आहे. जगभरामध्ये ओमायक्रॉनबाबत सुरू असलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. घशातील संसर्गामुळे त्याच्या संक्रमणाचा वेग अधिक राहील, मात्र फुप्फुसांवर परिणाम करत नसल्याने संसर्गाची तीव्रता कमी राहील, या अंदाजाला या संशोधनामुळे बळकटी मिळाली आहे.


ओमायक्रॉनने जगभरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. आतापर्यंत जगभर थैमान घातलेल्या सर्व करोना उत्परिवर्तनांच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग पाचपट आहे, मात्र तो आरोग्यावर गंभीर परिणाम करणार नाही, असे निरीक्षण दक्षिण आफ्रिकेतील उद्रेकानंतर नोंदवण्यात आले होते. जगातील सहा संशोधक गटांनी केलेल्या अभ्यासातून ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान फुप्फुसे नसून घसा हे आहे, हे स्पष्ट झाले आहे. फुप्फुसांच्या आरोग्यावर हा विषाणू थेट परिणाम करत नसल्यामुळे ओमायक्रॉन संसर्गाची गुंतागुंत कमी राहणार असल्याचे या संशोधनातील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post