नेवासा तालुक्यात भाजपला गळती, मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

 

नेवासा तालुक्यात भाजपला गळती, मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेशनगर: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यात शिवसेना संघटना वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. 

राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन,त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास दाखवत तसेच तालुक्याला दिलेल्या मंत्री पदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध होऊन नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नेवासा बु. येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post