श्रीगोंद्यात राजकारण तापले... राजेंद्र नागवडेंचा बबनराव पाचपुतेंवर हल्लाबोल... म्हणाले आमच्यामुळे तुम्ही आमदार झाला...उपकाराची जाणीव...

 

श्रीगोंद्यात राजकारण तापले... राजेंद्र नागवडेंचा बबनराव पाचपुतेंवर हल्लाबोल... म्हणाले आमच्यामुळे तुम्ही आमदार झाला...उपकाराची जाणीव...
नगर: श्रीगोंदा तालुक्यात नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीमुळे राजकारण तापले आहे.  आ.बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नागवडे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राजेंद्र नागवडे यांनी प्रत्युत्तर दिले. 

वांगदरी येथे  शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेलच्या प्रचारास प्रारंभ झाला. या प्रसंगी राजेंद्र नागवडे बोलत होते. त्यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण पाचपुते होते.

राजेंद्र नागवडे म्हणाले की, आम्ही शिवाजीराव बापूंच्या संस्कारात वाढलो असल्याने मर्यादा ओलांडणार नाहीत. कारखान्यात कारभार चोख केला. त्याचे उत्तर निवडणूक निकालात मिळेलच. विधानसभेत आपण गेलाही नसता पण आम्ही मदत केली म्हणून तु्म्ही आमदार झालात. या उपकाराची जाणीव ठेवताल असे वाटत होते. मात्र, ती विसरुन विरोधात पॅनेल केले. तुम्ही नाही ठेवली मात्र, तुमचे कार्यकर्ते उपकाराची जाणीव ठेवून आमच्यासोबत राहतील, असा पलटवार आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर राजेंद्र नागवडे यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post