राजेंद्र नागवडे म्हणतात... विघ्नसंतोषी माणसं एकत्र येऊन दिशाभूल करत आहेत... video

 राजेंद्र नागवडे म्हणतात... विघ्नसंतोषी माणसं एकत्र येऊन दिशाभूल करत आहेत... videoश्रीगोंदा - सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवड़े सहकारी साखर कारखान्याची रणधूमाळीत आरोप-प्रत्यारोपात जोरदार सुरु असून एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात नेते मग्न आहेत. येत्या 14 जानेवारीला होऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीत भिन्न-भिन्न विचारांचे माणस एकत्रित आले असून फक्त आमच्यावर टिका करणे हेच त्यांचे काम आहे.

         आमचा कारभार अतिशय स्वच्छ व पारदर्शी असून सभासदांच्या हिताचा आहे.शेतकरी वर्गाला वेळोवेळी उसाचे पैसे दिले गेले आहेत.साडे सहा हजार टन उसाचे गाळप सध्या होत असून राज्यात कारखान्याची आर्थिक स्थिति आज उत्तम असून काही विघ्नसंतोषी माणस एकत्र येऊन सभासदांची दिशाभूल करत आहेत. खोटी- नाटी परिपत्रके व पुस्तिका वाटून शेतकरी वर्गाची दिशाभूल करत असून सभासद यावर विश्वास ठेवनार नाहीत असे वक्तव्य राजेन्द्र नागवडे यानी पत्रकारांशी बोलताना केले.

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post