सरकार आहे पण आम्हाला कोणी विचारत नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखद

 

सरकार आहे पण आम्हाला कोणी विचारत नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखदसोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे आणि ती खदखद आता उघडपणे बाहेर येत आहे. सांगोला तालुक्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनीही ही नाराजी व्यासपीठावर उघड केली आहे, घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत, शहाजी पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी माढा मतदार संघातील इतर नेत्यांचेही नुकसान झाल्याचे बोलून दाखवले आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची खदखद पुन्हा बाहेर आली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post