आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत, फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत, फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखलसांगली : भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरदेखील फिर्यादीने अनेक आरोप केले आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात झरे येथील फिर्यादी महादेव वाघमारे यांनी तशी तक्रार दिली आहे.


गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोन्ही बंधूंविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात IPC 420 सह म्हणजेच फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2011 साली त्यांचा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंसोबत जमिनीचा व्यवहार झाला होता. याच व्यवहारासंदर्भात वाघमारे यांना काही आक्षेप आहेत. बनावट कागदपत्रे करुन फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फिर्यादी वाघमारे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी वापरण्याच्या कारणावरून देखील त्यांनी फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post