वाडिया पार्क मैदानावर अवतरला 'युवराज', ६ चेंडूवर ६ षटकार

 आमदार चषक 20-20 स्पर्धेत प्लेयर अकॅडमी संघाच्या खेळाडूची विक्रमी नोंद


सहा चेंडूत सहा षटकारनगर  - वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय 20-20 आमदार चषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चुरशीचे होत आहे. पुनीत बालन क्रिकेट टीम व प्लेयर अकॅडमी यांच्यात झालेल्या सामन्यात प्लेयर अकॅडमीचा फलंदाज अमोल लहासे यांने 20 चेंडूत 50 धावा काढीत सहा चेंडूत सहा षटकार ठोकत वाडीयापार्कच्या मैदानावर विक्रम नोंदविला.

          पुनितबालन क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद,184 धावा केल्या तर सुजित उबाळे यांने 49, ऋषभ राठोड 38,अनिकेत कुंभार 34 धावा केल्या तर तेजस दिकोंडा याने 31 धावा देत दोन बळी घेतले.प्लेयर अकॅडमी क्रिकेट टीम सतरा षटकात सर्व बाद 110 धावा पर्यंतच मजल मारली तर पुतीनबालन या टीमने 74 धावने विजय मिळवला. प्लेयर अकॅडमी टीमचा खेळाडू अमोल लहासे याची एक तर्फी खेळाची झुंज अपयशी ठरली तर खेळाडू लहासेने वाडिया पार्क मैदान येथे विक्रमी नोंद केली सहा चेंडूत सहा षटकार त्यांने मारले तसेच विजयी संघ पुनितबालन संघातील खेळाडू हेरम परब याला अष्टपैलू कामगिरी मुळे 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केले.


          तर दुसऱ्या सामन्यात हुंडेकरी क्रिकेट क्लब विरुद्ध शिरसाठ अकॅडमी सामन्यांमध्ये हुंडेकरी क्रिकेट क्लब संघ विजय झाला या संघाने 19.5 षटकात एक बॉल राखून विजय मिळवला तर शिरसाठ अकॅडमी क्रिकेट क्लबने 20 षटकात 6 बाद 138 धावा केल्या या दुसऱ्या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' किरण चोरमले यांना देण्यात आले या झालेल्या सामन्यात नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post