रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून शिवसेना आमदाराचा थेट शरद पवारांवर निशाणा...

 

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून शिवसेना आमदाराचा थेट शरद पवारांवर निशाणा...सातारा: साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे  आक्रमक झाले असून त्यांनी पवार घराण्यावर निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेचे  खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.जनतेचा विचार करून शरद पवार साहेब  रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.


महेश शिंदे यांनी रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. आज रयत मध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात असल्याच्या चर्चा असल्याचा गंभीर आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post