सरकारी रुग्णालयात उपचार घेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची करोनावर मात


सरकारी रुग्णालयात उपचार घेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची करोनावर मात नगर:  राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करोनावर पुन्हा एकदा मात केली आहे.  प्राजक्त तनपुरे यांचा साधेपणा कोरोना उपचार काळातही दिसून आला.   मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले. 

या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. ट्विटमध्ये तनपुरे यांनी म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने रोजचं रुटीन पुन्हा हळूहळू सुरू करतोय.  बहुतेक डिस्चार्ज मिळेल. मात्र तुम्ही सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. शासनाने घातलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन, पोषणयुक्त आहार आणि सकारात्मक विचार आपल्याला कोरोनापासून नक्कीच दूर ठेवतील, असे त्यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post