उत्तर प्रदेशसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, बड्या कॉंग्रेस नेत्याने बांधले 'घड्याळ'

 

उत्तर प्रदेशसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, बड्या कॉंग्रेस नेत्याने बांधले 'घड्याळ'मुंबई: उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजपचे आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. जनमत विरोधात जात असल्यानेच भाजपचे आमदार पक्षाला रामराम ठोकत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर   या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे   नेते सिराज मेहंदी यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. त्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post