पाचपुतेंच्या परिक्रमा शिक्षण संकुलाची बिगर शेती ऑर्डर कशी तयार झाली? सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज

पाचपुतेंच्या परिक्रमा शिक्षण संकुलाची बिगर शेती ऑर्डर कशी तयार झाली? सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज नगर - मौजे काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या माध्यमातून परिक्रमा शिक्षण स्कूल सुरू आहे सदर शिक्षण स्कूल सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नाशिक यांच्या मंजुरीने सुरू आहे. सदर शिक्षण संस्थेस मंजुरी मिळण्यासाठी शिक्षण स्कूल कडून उपविभागीय अधिकारी कर्जत विभाग यांच्या आदेशाने 2 फेब्रुवारी 2012 रोजी बिगरशेती ऑर्डर तयार झाली, आणि शिक्षण संकुल मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आणि  शैक्षणिक प्रयोजनासाठी क्षेत्रास परवानगी दिली, आणि या क्षेत्रावर सुमारे दीड हजार कोटी चे शिक्षण संकुल उभे राहिले. परंतु काही कालावधीनंतर उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभाग यांना   विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी 24 ऑक्टोंबर 2018 रोजी माहिती अधिकार अर्ज दिला की नमूद गट वरील क्षेत्र  कोणत्या कागद पत्राच्या आधारे बिगरशेती करण्यात आले ? आहे.

 त्यावर उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभागीय यांनी बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचा बिगरशेती शैक्षणिक प्रयोजनासाठी चा अर्ज दिनांक 2008 व ऑगस्ट 2009 व दिनांक 16 /8/ 2011 रोजी निकाली काढल्याचे  लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. सोबत येणे एन ए एस आर रजिस्टर च्या छायांकित प्रती दिल्या मग सदर बिगरशेती मागणी प्रस्ताव 16 /8/ 2011 रोजी निकाली काढला आहे. मग 02/02/2012ची बिगर शेती ऑर्डर तयार झालीच कशी आणि त्याच बिगरशेती आर्डरवर  शिक्षण स्कूल मंजूर झालेच कसे आणि प्रत्येक बँकांनी कशाच्या आधारे हजारो कोटीचे कर्ज मंजूर केले असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्यास त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे निवेदन  जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी निवेदन दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post