दुकानातील लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी... नगरच्या मार्केट यार्ड येथील घटना


दुकानातील लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी... नगरच्या मार्केट यार्ड येथील घटना नगर : मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी  दुपारच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. चार मजली दुकानात लिफ्टही बसविण्यात आलेली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यात लिफ्टमधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिघा जखमींपैकी एकास शासकीय रुग्णालयात, तर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  घटना घडलेल्या इमारतीला महापालिकेची बांधकाम परवानगी होती का? इमारतीमध्ये लिफ्ट बसविणार्‍या कंपनीने परवानग्या तपासल्या होत्या का? घटना नेमकी कशामुळे घडली? असे सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post