एकदिवसीय मालिकेसाठी भारताला मिळाला नवा कर्णधार, रोहित शर्मा याला विश्रांती

 

एकदिवसीय मालिकेसाठी भारताला मिळाला नवा कर्णधार, रोहित शर्मा याला विश्रांतीमुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  यांच्यातील कसोटी सामना संपला असून वन डे सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.  तर केएल राहुलवर  कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.


19 जानेवारीपासून दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वन-डे मालिका होणार आहे. वन-डे टीमचा नवा कॅप्टन रोहित शर्माच्या फिटनेसचा संभ्रम अजून कायम होता. त्यामुळे आज झालेल्या बैठकीनंतर रोहितला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच्या जागीच टीम इंडियाचं नेतृत्त्व केएल राहुल करणार आहे. विशेष म्हणजे, जसप्रित बुमरावर उप कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे.

केएल राहुल (Capt), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वाय चहल, आर अश्विन, वाश्गिटन सुंदर, जे बुमराह (vc), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसीद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post