‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील फेम किरण माने यांना 'नारळ', राजकीय स्थितीबाबत परखड भाष्य नडले

 

मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील फेम किरण माने यांना 'नारळ', राजकीय स्थितीबाबत परखड भाष्य नडलेमुंबई : सोशल मीडिया किंवा एखाद्या जाहीर व्यासपीठावर कुठल्याही क्षेत्रातील एखादा कलाकार किंवा सामान्य माणसाने राजकारणाबाबत परखड मत व्यक्त केल्यास त्याला त्याचे परिणाम भोगावे लागल्याच्या अनेक घटना घटना ऐकायला किंवा पाहायला मिळत असतील. असाच एक प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने  ्यां्च्या्बाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोलश मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात काल टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा! असी माने यांची पोस्ट आहे. या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. माने यांच्या भूमिकेचं त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार समर्थन केलं जात आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post