गिरीश महाजन यांना पुण्याच्या 'बुधवार पेठेत' पाठवलं पाहिजे


गिरीश महाजन यांना पुण्याच्या 'बुधवार पेठेत' पाठवलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, पण गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, पण गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. जळगावला सध्या जे मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मोक्का संदर्भात जी कारवाई सुरू आहे त्यात अधिक माहिती घेण्यासाठी हे छापे असावेत.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post