परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत, करूणा मुंडे आक्रमक

 

परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत, करूणा मुंडे आक्रमकपुणे: शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी आगामी काळात परळीतून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. वेळ आली तर परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत होईल, असं म्हणत करूणा मुंडे यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी गुरुवारी (१३ जानेवारी) पुण्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यांना संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

करुणा मुंडे म्हणाल्या, “माझी घोषणा वेगळी आहे. ‘कार्यकर्ता आगे बढो, करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे’ अशी माझी घोषणा आहे. मी माझ्या लोकांची नेता झाली आहे, तर मी त्यांचा झेंडा उचलेल. मी आत्ता निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. मात्र, जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली, तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढेन. नवरा विरुद्ध बायको लढत होईल.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post