सोनं खरेदीची सुवर्ण संधी...आजचा बाजार भाव

 

सोनं खरेदीची सुवर्ण संधी...आजचा बाजार भावमुंबई: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,२६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,२६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,२६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१७ रुपये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post