भाजपला दुहेरी धक्का... विद्यमान मंत्र्यासह आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी


भाजपला दुहेरी धक्का... विद्यमान मंत्र्यासह आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी पणजी : विधानसभा निवडणूक जाहीर होताच गोव्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत़  विज्ञान- तंत्रज्ञानमंत्री, भाजप आमदार मायकेल लोबो आणि आमदार प्रवीण झान्टे यांनी सोमवारी भाजपचा राजीनामा दिला़

लोबो यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला़ मंत्रिपदाबरोबरच आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याचे लोबो यांनी स्पष्ट केल़े  ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आह़े  लोबो कळंगुटचे आमदार होते.  लोबो यांच्या पाठोपाठ मये विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण झान्टे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़ ते ‘मगोप’मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आह़े

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post