राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष... राष्ट्रवादीत घरवापसी केलेल्या नेत्याचे मोठं वक्तव्य

 राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष... राष्ट्रवादीत घरवापसी केलेल्या नेत्याचे मोठं वक्तव्यमुंबई: मराठवाड्यात भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल होण्याचेही सत्र सुरू झाले आहे.परभणीतील भाजपचे नेते आणि शेकापचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी वीस वर्षानंतर भाजपला रामराम म्हणत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हा प्रवेश करत असतांनाच त्यांनी एक भाकीत केले, ते म्हणजे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील. आता यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगितुरा रंगण्याची शक्यता आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी भवनात विजय गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवारांचे नेतृत्व मान्य करत पक्षात प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात गव्हाणे यांनी भाजपच्या बदलत्या विचारसरणी आणि बहुजनांवर होणारा अन्याय याची काही उदाहरणे दिली.

गव्हाणे म्हणाले, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या काळातील भाजप आता राहिलेली नाही. ती झपाट्याने बदलते आहे. मुंडेच्या राजकीय मैत्रीतून मी भाजपमध्ये गेलो, पण २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले, त्यानंतर मी दिल्लीत आणि तिथल्या भाजप कार्यालयात कधी पाय ठेवला नाही. या पक्षात बहुजनांवर सातत्याने अन्याय होत आहे. आमच्या काळात १७ संघटनमंत्री होते, त्या पैकी १४ जणांना हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी उच्चवर्णीयांची वर्णी लावण्यात आली.

राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस चालवतात, तेच पक्षाचा चेहरा आहे असे भासवले जात असले तरी ते फक्त स्टेजवरचे अॅक्टर आहेत, खरा पक्ष नारायण राणे, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील हेच चालवतात, असा दावाही गव्हाणे यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post