अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारात वैद्यकीय अधिकार्याचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला....

अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारात वैद्यकीय अधिकार्याचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला....यवतमाळ : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा दुचाकीवर आलेल्या अनोळखी मारेकऱ्यांनी बेछूट गोळीबार  करत खून केला. येथील शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळ या घटनेने हादरून गेले आहे. 

उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात डॉ. हनुमंत धर्मकारे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत होते. महिनाभरापासून ते रजेवर होते. सुटीनंतर ते आज कामावर रुजू झाले होते. कामावर रुजू झाल्याची दप्तरात नोंद करून ते रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या कॅन्टिनवर चहा घेण्यासाठी बाहेर आले होते. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्या मारेकऱ्याने लागोपाठ चार गोळ्या डॉ. धर्माकारे यांच्यावर झाडल्या. 

माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील हे मंगळवारी उमरखेडच्या दौऱ्यावर होते. त्यांना या घटनेचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post