राष्ट्रवादी तर साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका


राष्ट्रवादी तर साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीकामुंबई:  गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या वरून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

तसेच, “निश्चतच, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल.” असं देवेंद्र फडणवीसांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post