नियम पाळा.. जिल्ह्यात बरे होण्याच्या तुलनेत नवीन बाधित वाढले

 *दिनांक 06 जानेवारी, 2022*


*आज 26 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 156 बाधितांची रुग्ण संख्येत भर*


*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के*



अहमदनगर: जिल्ह्यात आज 26 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 767 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.85 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 156 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 563 इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 62, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 86 आणि अँटीजेन चाचणीत 8 रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 09, अकोले 06, जामखेड 02, नगर ग्रा. 07, नेवासा 01,  पारनेर 01, पाथर्डी 05, राहाता 01, राहुरी 01, संगमनेर 01, शेवगांव 01, श्रीगोंदा 06, कॅन्टोनमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.



खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28, अकोले 03, जामखेड 02, कर्जत 01, कोपरगांव 01, नगर ग्रा. 06, नेवासा 01, पारनेर 04, पाथडी 02, राहाता 06, राहुरी 03, संगमनेर 04, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 03, कॅन्टो्नमेंट बोर्ड 07, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 05 आणि इतर राज्ये 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज 08 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 02, पारनेर 01, राहाता 03, राहुरी 01 आणि इतर जिल्हाच 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 12, जामखेड 01, कर्जत 02, नगर ग्रा 02, नेवासा 02, पाथर्डी 01, राहाता 01, संगमनेर 01, शेवगांव 02, श्रीगोंदा 01 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,767*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:563*


*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7156*


*एकूण रूग्ण संख्या:3,59,486*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post