मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी

 मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणीनवी दिल्ली: देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. 


CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post