राज्याला ७० दिवसांपासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नाही, अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा

 

राज्याला ७० दिवसांपासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नाही, अन्य नेत्याकडे पदभार सोपवावामुंबई : राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करोनाच्या प्रश्नी गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री दृकश्राव्य माध्यमातूनही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन-अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

राज्यात करोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post