बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत विशाल सूर्यवंशी बिनविरोध

 बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत विशाल सूर्यवंशी बिनविरोध

पदापेक्षा कामांला महत्व देत जा - माजी आ.शिवाजीराव कर्डिले     नगर - राहुरी मतदार संघातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 5 मधील सदस्य राजेंद्र पाखरे यांचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गावात, परिसरात कोरोना योद्धा म्हणून काम करतांना निधन झाले होते, त्यांच्या रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली.

     राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पोटनिवणुकीत गजराजनगर येथील युवक कार्यकर्ते विशाल सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचा श्री.कर्डिले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देेऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच रावसाहेब कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, सदस्य निखिल भगत, निवृत्ती कर्डिले, अजय कर्डिले, श्रीधर पानसरे, युवक कार्यकर्ते दत्ता तापकिरे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बबलू सूर्यवंशी, राहुल माने, प्रताप गायकवाड, राज आंबेकर, सागर मेट्टू, अक्षय सकट, सचिन गाडे आदि उपस्थित होते.

      तरुणांना मार्गदर्शन करतांना माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी एकच मोलाचा सल्ला दिला, तुम्ही पदाने नाही तर तुमच्या कामाने ओळखले गेले पाहिजे. पदापेक्षा लोकांची कामे करा, चांगले काम करा आणि कामातून तुमची वेगळी ओळख निर्माण करा. पदापेक्षा कामाला महत्व देत जा, म्हणजे सर्वसामान्य लोक तुम्हाला महत्व देतील, असे सांगितले.

     सत्काराला उत्तर देतांना विशाल सूर्यवंशी म्हणाले की, आम्ही बुर्‍हाणनगरचे सर्व सदस्य, सरपंच,  शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. त्यांना अभिमान वाटेल असेच काम आम्ही सर्व एकजुटीने करु. बुर्‍हाणनगर व ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या उपनगरातील रस्ते, लाईट, पाण्याचा प्रश्न साहेबांच्या निधीतून मार्गी लागले, ग्रा.पं.च्या निधीतून ड्रेनेज कामे सध्या सुरु आहे. ती पुर्ण करुन बुर्‍हाणनगर गाव विकासाचे एक मॉडेल बनवू, असे सांगितले.

      यावेळी प्रदीप परदेशी, भुषण भिंगारदिवे, विकी नेटके, करण क्षेत्रे, प्रदीप देठे, शाम लोंढे, जावेद पठाण, नईम शेख, मोसिम पटेल, अभिषेक पाखरे, साहिल शेख, मुश्तकीन पठाण, योगेश गायकवाड, आशिष बोदर्डे, लखन चखाले, सागर जगताप, राजु गाडे, दत्ता बोरुडे, आकाश लांडगे, राकेश शिनगारे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, जाहिद शेख,  बाबू भालेकर, गणेश कांबळे, दत्ता पोतकुले, सुरेश शिंदे, शुभम पांडूळे आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post