अखेर बीड-नगर रोड- जामखेड रस्त्याचे डांबरीकरण, खड्डे बुजवण्याचे काम चालू

 *स्वप्निल खाडे यांच्या पाठपुराव्याला यश नगर बीड रोड मजबुतीकरण काम सुरू* 

अखेर बीड नगर रोड जामखेड डांबरीकरण खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले
नगर: गेल्या कित्येक दिवसापासून, राष्ट्रीय महामार्ग 548 डी. नगर बीड रोड हा नगर रोड जामखेड ते  सौतडा घाट बीड रोड जामखेड पर्यंत अतिशय नेस्तनाबूत झालेला आहे, आणि बीड जिल्हा तसेच मराठवाड्यात प्रवेश करणारा जामखेड मधून जाणारा हा रस्ता, त्यामुळे लोकांची जास्त दळण वळण व वाहतूक ह्या मार्गाने जास्त होती, महत्वाचे म्हणजे हा रस्ता आमदार रोहित पवार व खासदार सुजय विखे यांच्या मतदार संघातील आहेत, असे वाटतं नव्हते एवढ्या निष्क्रिय पद्धतीने रस्ता खराब झाला आहे,

राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता कार्यालय अहमदनगर येथे असल्याने नागरिकांचे तक्रारी व म्हणने तीत पर्यंत पोहचत नसे, सतत ह्या मार्गावर अपघात होत असून नागरिक मृत्युमुखी पडत आहेत तरी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता व राष्ट्रीय बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत होते, तसेच जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे हे पाठपुरावा व निवेदन देत असत, वारंवार सांगूनही दखल नसे म्हणून खाडे यांनी दि.25/ऑगस्ट / 2021 रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन असे लाक्षणिक आंदोलन केले होते व त्यानंतर ही दखल घेतली जात नव्हती म्हणून श्री खाडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन द्वारे तक्रार केली होती, तसेच वारंवार पाठपुरावा करत, आंदोलने करत होते, उप अभियंता श्री. तरडे यांनी 4 महिन्यात डांबरी मजबुतीकरण करू असा शब्द दिला व रस्ता मजबुती करण चालू झाले म्हणून श्री स्वप्नील खाडे यांची जामखेड तालुका परिसरात कौतुक होत आहे....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post