कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसास मारहाण, पिता-पुत्राला कारावासाची शिक्षा


कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसास मारहाण, पिता-पुत्राला कारावासाची शिक्षा नगर: करोना काळात नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला जिल्हा न्यायालयाने भादंवि कलम ३५३ व ३४ अन्वये दोषी धरून एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ३३२ व ३४ अन्वये दोषी धरून सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.


मुकेश रघुनाथ चोपदार व त्याचा मुलगा प्रसाद मुकेश चोपदार (रा. दिल्लीगेट, नगर) अशी शिक्षा झालेल्या पिता ता पुत्राची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. ती गारे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील आर. आर. त्रिमुखे यांनी काम पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post