भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

 भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीसनाशिक/जळगावः राज्याच्या राजकारणात भूकंप करणाऱ्या आणि सत्ताधारी भाजपच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेच्या गळाला लागलेल्या 27 नगरसेवकांमुळे आता भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या 11 जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचलीय


जळगाव महापालिकेत भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. महापौर निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. त्यात शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली आहे. मात्र, खरे नाट्य इथून पुढेच घडले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post