देशात करोनाचा प्रचंड उद्रेक, 24 तासात अडीच लाख बाधित, पंतप्रधान मोदींनी बोलविली तातडीची बैठक

देशात करोनाचा प्रचंड उद्रेक, 24 तासात अडीच लाख बाधित, पंतप्रधान मोदींनी बोलविली तातडीची बैठक 
 देशातील करोना संसर्ग आता अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या काल आढळलेल्या करोनाबाधितांच्या २७ टक्के अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच, ३८० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले असून, आतापर्यंत देशभरात ४,८५,०३५ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. याशिवाय ८४ हजार ८२५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ११,१७,५३१ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्के आहे. याशिवाय, ५ हजार ४८८ ओमायक्रॉन बाधितही आढळून आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post